थोरातांसह मंत्र्यांच्या दूध संस्थांना दीडशे कोटींचा मलिदा मिळाला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- दूध दरासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना करून ६ कोटी लिटर दूध २५ रुपये लिटरने खरेदी केले. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही. उलट सरकारने खर्च केलेल्या दीडशे कोटींचा मलिदा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मंत्र्यांच्या दूध संघांना मिळाला. 

मूठभर लोकांसाठी ही योजना सरकारने केली. शेतकऱ्यांना फायदा होणार नव्हता, तर योजना केली कशाला, असा प्रश्न माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित करतानाच सरकारने दुधाबाबत योग्य निर्णय घेतला नाही, तर कोल्हापुरात मोर्चा काढून तीव्र लढाई सुरू करू आणि सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा त्यांनी दिला.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, देशात व राज्यात पडून असलेल्या दूध पावडरीच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, जीएसटी कमी करा या मागण्यांसाठी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.

प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष बंगाळे, जिल्हाध्यक्ष रवी मोरे व सुनील लांढे, कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे, स्नेहल फुंदे, रमेश कचरे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोर्चात सहभागी झाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment