अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- काष्टी येथील सहकारमहर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी सहकार मंत्री,
सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. चौकशी करून अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असा आदेश सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी गुरुवारी दिला.
चौकशी करण्यासाठी जामखेड येथील सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक संचालक भगवानराव पाचपुते हे संस्थेचा वापर आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी करत
असल्याचे राकेश पाचपुते व माने यांचे म्हणणे आहे. तत्कालीन व्यवस्थापक जे. एम. पाचपुते यांनी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीची चौकशी व्हावी,
वर्षानुवर्षे विविध विभागातील खरेदी ठरावीक व्यापाऱ्यांकडून होत असल्याने ती सदोष पद्धतीने होऊन भ्रष्टाचार झाल्याची श्यक्यता आहे. नियमबाह्य कर्जवाटप,
सोसायटीसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात सहकार खात्याला अंधारात ठेवून आर्थिक घोटाळा अशा विविध मुद्द्यांवर चौकशीची मागणी करण्यात आली होती.
सोसायटीची वार्षिक उलाढाल २०० कोटींवरून ४५ कोटींवर कशी आली? हे जनतेसमोर लवकरच येईल. ही संस्था स्व. शिवरामअण्णा पाचपुते यांनी वाढवली. ती टिकली पाहिजे, असे माने म्हणाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved