अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील विसापूरफाटा येथे खळबळ जनक घटना घडली आहे. नाशिक परिसरातील काही लोकांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. देण्याघेण्याच्या वादातून चौघांचा खून झाला असून या हत्याकांडाने काल नगर जिल्हा हादरून गेला होता. नाशिक जिल्ह्यातील काही लोक स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापुरफाटा येथे आले होते.
यामध्ये जिल्ह्याबाहेरील दोन महिलांसह काही लोक असून ते एका वाहनातून आले होते. त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, या वादातून चौघांचा खून झाला आहे. आपली फसवणूक होवू नये यासाठी नाशिक परिसरातील लोक तयारीनिशी आले होते. त्यातील एका व्यक्तीने हातात चाकु लपविला होता.
विसापूर फाटा येथील लोकांनी प्लॅनिंग केले होते कि, पैशाची बॅग दिसली की लगेच हिसकवायची. ठरल्याप्रमाणे झालंही. मात्र त्यावेळी समोरच्या व्यक्तीने चाकूने सपासप वार करीत त्या चौघांचा मुडदा पडला. त्यानंतर ते पसार झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश सिंह रात्रीपासून बेलवंडी पोलिस ठाण्यात तळ ठोकून आहेत.
काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या या थराराचे वास्तव वेगळेच निघत आहे. मयतच्या आईने तिच्या सख्या भाच्यांविरुध्द बेलवंडी पोलिसात फिर्याद दिली आहे. यात अक्षय उंबऱ्या काळे, मिथुन उंबऱ्या काळे व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी तिचा मुलगा नाथीक कुंज्या चव्हाण, श्रीधर चव्हाण, नागेश चव्हाण व लिंब्या हावऱ्या काळे यांचा खून केला आहे.
त्यासाठी फिर्यादीत पुर्वीचे वैर दाखविण्यात आले आहे. पोलिसांनी फिर्यादीनूसार गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेतील न दिसणारी तपासाची दिशा आता उलगडत असल्याची माहिती मिळाली आहे. असे रचले आणि असे घडले कांड समजलेल्या माहितीनूसार, नाशिक जिल्ह्यातील काही व्यक्ती स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापुरफाटा येथे आले होते.
त्यांच्यासमेवत काही महिलाही होत्या. त्यांच्याकडे नोटांनी भरलेली बॅग होती. ठरलेल्या व्यवहारात पैसे देवून सोने घेण्याचे ठरले होते. सोन्याच्या नावाखाली ड्राॅप करण्याचा फंडा अनेक वर्षांपासून श्रीगोंद्यात सराईतपणे सुरु आहे. आपण फसले जावू शकतो याची शक्यता असल्याने सोने घेण्यासाठी आलेले व्यक्तीही तयारीत होते.
पैसे घेवून सोने देण्यासाठी काही व्यक्ती समोर आले आणि इतर दबा धरुन बसले होते. पैशाची बॅग दिसली की ती हातातून हिसकावली आणि पळू लागले. त्याचवेळी सोने घेण्यासाठी आलेल्या एका उंच व्यक्तीने हातात लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत ज्याने बॅग हिसकावली त्यावर वार केला. तो ओरडल्याने लपून बसलेले काही व्यक्ती समोर आले.
त्यावेळी त्या चाकुधारी व्यक्तीने त्यांच्यावरही सपासप वार सुरु केल्याने इतरांनी तेथून धूम ठोकली. सोने घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी लगेच जवळच लावलेल्या त्यांच्या वाहनाकडे धाव घेतली आणि तेथून पसार झाल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांचे एक पथक त्या आरोपींच्या शोधासाठी गेल्याचीही माहिती आहे.
नगरचे एसपी घटना घडल्यानंतर काल रात्री जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेश सिंह हे येथे आले. ते रात्रीपासून बेलवंडी पोलिस ठाण्यात ठाम मांडून बसेल असून चार जणांची हत्या झाल्याने ते गंभीरतेने तपास करीत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved