अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : जनमतच्या विरोधात जावून बनलेलं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असून तिन चाक आहेत, यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबईला , बारामतीला की संगमनेरला आहेत याच खरा प्रश्न आहे.
आम्ही सरकार पाडू इच्छित नाही, ते त्यांच आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवाव अशी आमची इच्छा आहे. मात्र ते चालवत नाहीत. आणि मग त्यातून भारतीय जनता पार्टीवर आरोप केला जात आहे.
असं देखिल खा. विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान शिर्डीचे आंतराष्ट्रीय किर्ती प्राप्त असलेल साईबाबा मंदिर साडेपाच महिन्यापासून बंद आहे.
केंद्र सरकारनं प्रार्थना स्थळे खुले करण्याबाबत आधिच अनुमती दिली आहे. मात्र राज्य सरकार निर्णय का घेत नाही असा सवाल डॉ सुजय यांनी उपस्थीत केला आहे.
शिर्डीच सर्व अर्थकारण येणा-या भाविकावंर अवलंबून असल्यानं सध्या सर्व व्यवहार ठप्प होतांना दिसत आहे. केंद्र सरकारन विविध उपायोजना राबवून देशवासींयाना मदत केलीच आहे.
तरी सध्याची परिस्थीती लक्षात घेता नागरिकांच्या इतर गरजा देखिल आहेत. मुलांच्या शाळा-कॉलेजची फी भरण आहे. त्यामुळे येथिल अर्थकारण पुन्हा सुरळीत होण्यासाठी पाऊलं उचलण्याची गरज आहे.
त्यामुळे टप्प्याटप्यानं साईबाबा मंदिर खुल करण्यासाठी नगरपंचायतचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे सह्याच पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं खा. सुजय विखे यांनी म्हटलं आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved