माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नगर शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सभा, गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूध दर वाढीसाठी हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. नगरमध्ये दूध दर वाढीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान शेतकरी संघटनेंच्या वतीने हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

करोना फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 125 ते 150 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई तन्वीर सलीम शेख यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, रविंद्र बापूसाहेब मोरे, प्रकाश देठे, मंगेश आजबे, सुनील लोंढे, भीमराव धांडे, ऋषीकेश हुणे, स्नेहल फुंदे, पूजा मोरे व इतर 125 ते 150 जणांचा समावेश आहे. दुधाला प्रति लिटर ३५ रुपये भाव देऊन,

दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान प्रत्येकाच्या खात्यात जमा करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. विनाकारण ठोस कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे, तसेच विना परवाना मोर्चा काढून एकत्र येऊन घोषणा देऊन कोविड 19 रोगाचा फैलाव होईल.

हे माहीत असतांना देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे भंग केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सभा, गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.

मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूध दर वाढीसाठी हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. नगरमध्ये दूध दर वाढीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान शेतकरी संघटनेंच्या वतीने हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

करोना फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 125 ते 150 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई तन्वीर सलीम शेख यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, रविंद्र बापूसाहेब मोरे, प्रकाश देठे, मंगेश आजबे, सुनील लोंढे, भीमराव धांडे, ऋषीकेश हुणे, स्नेहल फुंदे, पूजा मोरे व इतर 125 ते 150 जणांचा समावेश आहे. दुधाला प्रति लिटर ३५ रुपये भाव देऊन, दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान प्रत्येकाच्या खात्यात जमा करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

विनाकारण ठोस कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे, तसेच विना परवाना मोर्चा काढून एकत्र येऊन घोषणा देऊन कोविड 19 रोगाचा फैलाव होईल हे माहीत असतांना देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे भंग केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment