अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- जीवन कसं भरभरून जगावं याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोहिनूर वस्त्रदालनाचे मालक प्रदीप गांधी. केवळ व्यवसाय एके व्यवसाय न करता आयुष्य जगतांना इतरही अनेक विषय असतात.
त्याचाही आपल्या जीवनात स्पर्श असावा हे ते जाणून होते. एक ‘कापड दुकान’ ते क्लॉथ शॉप ही संकल्पना आपल्याकडे त्यांच्यामुळेच रूजली. केवळ पैसा नव्हे तर या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळाली.,
अशा शब्दांत एच. यू. गुगळे परिवाराचे रमेश गुगळे यांनी स्व. गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. गुगळे म्हणाले, पूर्णपणे झोकून देवून काम करणे, रसिकतेने घेतलेला सर्व कलेचा आस्वाद, ज्या शहराने मला दिले.
त्याला पूर्णपणे भरभरून देण्याची वृत्ती, अनेक गरजुंना त्यांचा वाटणारा आधार हे केवळ तेच करू जाणे. सर्वच क्षेत्रातील अनेक व्यक्ती त्यांच्याविषयी लिहित, आपले विचार मांडत आहेत.
एक कापड व्यापारी म्हणून मी म्हणेल की, अनेक लहान लहान शहरात मोठमोठी कापड व्यवसाय उभे राहिले ते त्यांना आत्मविश्वास त्यांचे मुळेच मिळाला.
अनेक व्यपारी ते काय करतात हे पाहून स्वतःची दिशा ठरवत होते. अनेक कापड व गारमेंट व्यापारी आपला माल त्यांचा सल्ला घेवून तयार करत होते.
आपल्या सोबत काम करणारे सहकारी आपल्या कुटूंबासारखेच सदस्य आहेत हे समजून त्यांच्या सर्व सुख दुःखामध्ये समरस होणारे प्रदीपभाऊ सारखे ‘मालक’ करीत फारच क्वचित.
आजही ते बदलत्या काळानुसार आपली व्यावसायिक क्षेत्र विस्तारण्याची स्वप्न पहात होते. ती त्यांची स्वप्ने आश्विन यांच्या रूपाने निश्चितच पूर्ण होतील, असा विश्वासही गुगळे यांनी व्यक्त केला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved