अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८८१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, श्रीरामपूर ०१,  कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर ०१, अकोले ०१, जामखेड ०५ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४२४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर २९, राहाता ०९, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३७,

श्रीरामपूर १२, कॅन्टोन्मेंट १४, नेवासा १३, श्रीगोंदा १९, पारनेर ३०, राहुरी ०७, शेवगाव १२, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: १३४७८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२८८१
  • मृत्यू: २२६
  • एकूण रूग्ण संख्या:१६५८५

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment