अहमदनगर ब्रेकिंग : खा.सुजय विखे यांना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा दररोज 500 च्या वर रुग्ण सापडत आहेत. या परिस्थितीत नगर दक्षिणचे खा.सुजय विखे हे जिल्ह्यात लॉकडाउनची मागणी करीत आहेत.

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून हेच खासदार गावोगावी 200 ते 500 लोकांच्या बैठका घेवून के.के.रेंजच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत आहे. खासदारांना करोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा आहे की, वाढवायचा आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे करोनाचा उद्रेक लक्षात घेवून खा.विखे यांना नगर दक्षिण जिल्ह्यात फिरण्यास बंदी घालावी, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे. खा.सुजय विखे हे के. के. रेंजच्या जागेच्या प्रश्नासाठी जिल्ह्यातील नगर, पारनेर व राहुरी या तीन तालुक्यातील काही गावांमध्ये 200 ते 500 लोकांच्या बैठका घेत आहेत.

असेच जर सभा बैठका खासदार घेत राहिले तर या सर्व बैठका झालेल्या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होउन संपुर्ण जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे. या वाढत्या कोरोना संसर्गला जबाबदार कोण असा सवाल भुतारे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे विचारला आहे.

या बैठकांमध्ये शेकडो नागरिक जमले असुन कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही, काहींनी मास्क घातले तर कहिनी नाही. कुठेही सॅनिटायझर वापरलेले दिसत नसुन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे. सर्व बैठकींचे फोटो बातम्या अनेक वृत्तपत्रात छापुन आल्या आहेत.

राजकिय सभा, बैठकांना बंदी असतांना देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई अजुनपर्यंत केलेली नाही. मग सर्व सामन्यांना वेगळा न्याय व लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय हे या प्रकारातून दिसत आहे. यापार्श्वभूमीवर खासदारांना कोरोना संपुष्टात येईपर्यंत नगर दक्षिण जिल्हा बंदी करा, अशी मागणी भुतारे यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe