पिंपळा लोणी सय्यदमीर ग्रामस्थांच्या वतीने स्वातंत्र्य दिनी तहसिल कार्यालया समोर जनावरे बांधून रास्तारोको करण्याचा इशारा

Ahmednagarlive24
Published:

बीड (प्रतिनिधी)- पिंपळा लोणी सय्यदमीर (ता. आष्टी, जि. बीड) येथील छावणी चालकांना सरकारी अनुदान मिळत नसल्याने चाराअभावी छावणी बंद करण्याची वेळ आली असता, गावातील शेतकर्‍यांनी छावणी पुर्ववत सुरु होण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी तहसिल कार्यालया समोर जनावरे बांधून रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे. 


पिंपळा लोणी सय्यदमीर येथे दुष्काळात जनावरांची सोय होण्यासाठी पिंपळेश्‍वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने छावणी सुरु करण्यात आली. छावणी चालक सुभाष वाळके व नवनाथ वाळके यांनी दि.24 जुलैपासून 550 ते 600 जनावरांना नियमितपणे चारा-पाणी पुरविला. मात्र शासनाने छावणी चालकांना अनुदान देणे बंद केल्याने छावणी चालकांना जनावरे सांभाळण्याचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. उसनवारी घेऊन छावणीचालकांना छावणी चालवावी लागत आहे. यासंदर्भात छावणी चालकांच्या वतीने दि.15 जुलै रोजी अनुदान मिळण्यासाठी अर्ज देण्यात आला होता. मार्च, एप्रिल, मे व जून या चार महिन्यात छावणी नियमीत चालू होती.

पाऊसाचे आगमन होताच छावणी बंद करण्यात आली. मात्र पाऊस अल्पप्रमाणात झाल्याने पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने छावणी पुर्ववत सुरु होण्यासाठी 15 जुलै रोजी संबंधीत विभागाल अर्ज देण्यात आला. शेतकर्‍यांना जनावरे सांभाळणे कठिण बनले असता त्यांच्या आग्रहास्तव सदर छावणी पुर्ववत चालू करण्यात आली. सध्या ही छावणी चालू आहे. मात्र शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने छावणी चालकांनी शेतकर्‍यांना हात जोडून पैसे नसल्याने चारा उपलब्ध करु शकत नसल्याचे वास्तवता मांडली. तर सदर छावणी बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले.


ग्रामस्थांनी नुकतीच सदर छावणीची पहाणी करुन तातडीने छावणी चालकांना अनुदान देऊन छावणी पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली. यावेळी रघुनाथ साळे, सागर सावंत, जयराम जाधव, हसन बेग, बाप्पू बोडरे, बादशहाभाई सय्यद, नामदेव वाळके, रामा जाधव, रावसाहेब गोरे आदी उपस्थित होते. दि.13 ऑगस्ट पर्यंन्त छावणी चालकांना अनुदान देऊन छावणी पुर्ववत सुरु न झाल्यास स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी छावणीचालक व गावातील ग्रामस्थ तहसील कार्यालया समोर जनावरे बांधून रास्ता रोको करणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment