आधी पॉझिटिव्ह नंतर लगेच निगेटिव्ह ; अहमदनगरच्या तरुणाने लिहिले थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. शहरामध्ये मात्र याचे प्रमाण सर्वाधिक आहे.परंतु अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची जी चाचणी केली जाते त्याबद्दलच शंका निर्माण झाली आहे. 

कारण कोरोनाच्या चाचण्यांमध्ये भिन्नता आढळत असल्याचे प्रकार जिल्ह्यात या आधी घडले आहेत. आता पुन्हा शहरात असा प्रकार घडला. महापालिकेच्या रिपोर्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आणि जिल्हा रुग्णालयाच्या टेस्टमध्ये निगटीव्ह आल्याचा अनुभव नगरमधील युवकास आला.

याबाबत त्याने खुद्द मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून मी पॉझिटिव्ह आहे कि निगेटिव्ह आहे असे विचारले आहे. पत्रात या तरुणाने म्हटले आहे की, ‘नगर शहर महानगरपालिकेतर्फे जी कोविड १९ अँटीजन (रॅपिड टेस्ट) तपासणी केली जाते, ही तपासणी खरंच कोविड सारख्या गंभीर महामारीचे निदान करते का? याबद्दल शंका आहे.

मी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा प्रशासन, अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने आयोजित कोविड-१९ अँटीजन तपासणी उपक्रमांतर्गत जुने नगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणी केली.

तपासणीनंतर दहा मिनिटांतच मला कोविड १९ ची लागण झाल्याचे सांगण्यात आले. मी खूप घाबरून गेलो व टेन्शन आले. परंतु मला चाचणीची शंका आली. कारण, तिथे प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह सांगत होते. मित्राशी चर्चा केल्यानंतर त्यानं मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्याचा सल्ला दिला.

अजिबात विलंब न करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो व तिथे स्वॅब दिला. दोन दिवसांनी, २३ ऑगस्टला सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट घेतला, त्यात मी निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. २४ ऑगस्टला मी पुन्हा रॅपिड टेस्ट केली, ती पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी करोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ? असा प्रश्न मला पडला आहे.

पुढे त्याने खासगी हॉस्पिटल मध्ये आलेला अनुभवही कथन केला आहे. ‘कोरोना टेस्टच्या नावावर जनतेची लूट सुरू आहे. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून सदर प्रकरणात योग्य ती कारवाई करावी व रॅपिड टेस्ट बंद करावी.

मी स्वतः आता गोंधळून गेलेलो आहे की मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? या सर्व निगेटिव्ह, पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये माझे काही बरे वाईट झाले, तर सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल,’ असंही या तरुणानं पत्रात नमूद केलं आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment