संगमनेरमधील ‘ह्या’ पाच गावांचा पाणीप्रश्न मार्गी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे थेट निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांना पाणीपुरवठा होणार असल्याने पाच गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

निमोणसह पाच गावांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. भोजापूर धरणाजवळ जॅकवेलचे कामही ही पूर्णत्वास येत आहे.

15 किलोमीटरची ही पाईपलाईन असून यामधून ग्रॅव्हिटीद्वारे या पाच गावांना पाणी मिळणार आहे. या योजनेचे भूमिपूजन मंत्री थोरातांच्या हस्ते पार पडले.

यावेळी इंजि. बी. आर. चकोर म्हणाले की, निमोण परिसरातील या गावांवर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम प्रेम केले असून या गावांना कायम पाणी पुरवठा व्हावा यासाठी दूरदृष्टीतून त्यांनीही कल्पना मांडली.

संगमनेर शहराला याप्रमाणे पाणीपुरवठा होतो आहे. तसाच ग्रॅव्हिटीद्वारे या पाचही गावांना पाणीपुरवठा होणार आहे. मंत्रालयातील मंजुरी, वन विभागाच्या मंजुरी जलदगतीने काम होण्यासाठी

अधिकार्‍यांना सूचना यासाठीचा आढावा नामदार थोरात कायम घेत असून याकामी इंद्रजीत थोरात ही पाठपुरावा केला आहे. मिराताई चकोर यांनी या योजनेच्या पाठपुराव्यासाठी खूप आग्रह धरला.

महसूलमंत्री थोरात यांनी प्रत्येक तालुक्यात वाडी वस्तीवर आणि गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले. प्रत्येक गावात रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, विद्युत जाळे निर्माण केले आहे. तालुका विकासातून वैभवाकडे जात असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment