नगर :- शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
मागील सात महिन्यांत तब्बल एक हजार मद्यधुंद वाहनचालकांना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी अनेकांना दंडात्मक, तर काहींना थेट तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
दारू पिऊन वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा मद्यपींवर केवळ ३१ डिसेंबरच्या रात्रीच सक्षमपणे कारवाई करण्यात येते. आता मात्र पोलिसांनी या मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू केली आहे.
कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येत आहे. राज्याच्या रस्ता सुरक्षा समितीनुसार अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नगर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शहर परिसरात रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी करून वाहनचालक दारू पिले आहेत काय? याची ब्रेथ ऑनालायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे सुसाट सुटलेल्या मद्यपींना चाप बसत आहे.
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













