‘ह्या’ तालुक्यात’ वाढले आजपर्यंतपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. काल सर्वाधिक बाधित रुग्ण अकोले तालुक्यात आढळून आले. तालुक्यात काल दि. 25 ऑगस्ट रोजी तब्बल 41 व्यक्ती कोरोना पॅाझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

त्यामुळे तालुक्यातखळबळ उडाली आहे. तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या 449 झाली आहे. त्यापैकी 316 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 10 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 123 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये धुमाळवाडी येथील 54 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय पुरूष, 15 वर्षीय तरुण 14, वर्षीय तरुण, 27 वर्षीय महिला, 40 वर्षीय महीला, 33 वर्षीय महिला,

21 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवती, 5 वर्षीय मुलगा, रेडे येथील 55 वर्षीय महीला, 32 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष,12 वर्षीय युवती, 07 वर्षीय मुलगी,

नवलेवाडी येथील 25 वर्षीय पुरूष, खानापूर येथील 53 वर्षीय पुरूष, अंभोळ येथील 35 वर्षीय पुरूष, शहरातील महालक्ष्मी कॅालनीतील 28 वर्षीय तरुण व देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट मध्ये 50 वर्षीय पुरुष,

ब्राम्हणवाडा येथील 80 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय पुरूष, 55वर्षीय पुरूष, 26 वर्षीय पुरूष,23 वर्षीय पुरूष, 85 वर्षीय महीला, 45 वर्षीय महिला, 45 वर्षीय महीला, 35 वर्षीय महिला,

08 वर्षीय मुलगी, 05 वर्षीय मुलगी, जामगाव येथील 44 वर्षीय पुरूष, शहरातील हनुमान मंदिराजवळ 49 वर्षीय पुरुष, कोतूळ येथील 66 वर्षीय पुरूष आदींचा यात समावेश आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!