चोवीस तासात कोरोनामुळे सात जणांचा बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात बुधवारी ८१० कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल २० हजारांचा टप्प्या ओलांडण्याच्या दिशेने सुरू झाली आहे.

गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे सात जणांचा बळी गेला असून, बळींची एकूण संख्या २६७ झाली आहे. नगर शहरात नवे ३२८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात २१ जूनपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत.

१ ऑगस्टपासून दररोजची संख्या तीनशेच्या पुढे गेली. ऑगस्टच्या अखेरीस दररोज जिल्ह्यात ५०० च्या पुढे रुग्ण आढळून येत आहेत. बाधितांची संख्या वाढली असताना मृत्यूचे प्रमाणही काहीसे वाढले आहे.

१ ऑगस्टपासून दररोज दहापेक्षा जास्त जणांचा बळी जात आहे. गेल्या २४ तासात प्रथमच जिल्ह्यात सर्वाधिक ८१० रुग्ण आढळून आले असून,

त्यात सर्वाधिक संख्या नगर शहरातील आहे. यापूर्वी दिवसभरात ७५७ रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत १८ हजार ८३१ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची वाटचाल २० हजारांच्या टप्प्याकडे सुरू आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment