काय सांगता! श्रीगोंद्यात ‘त्याने’ थेट झाडावर बसविला गणपती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  सध्या कोरोनाच्या सावटाखाली अनेक सण आणि उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे.

त्यामुळे यंदा अधिकाधिक आकर्षक सजावट न करता सामान्यपणेच बाप्पांचे पूजन होत आहे. परंतु यातही काही नवखे असे श्रीगोंदे तालुक्‍यातील कोरेगाव येथील तरुणाने केले आहे.

त्याने झाडावर मंदिर बनवून गणेश मूर्तीची स्थापना करीत अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे. राजन थोरात असे या तरुणाचे नाव आहे.

* अशी केली रचना :- बाभळीच्या झाडावर वीस फूट उंचीवर लाकडी फळ्या वापरून गणपती बसवण्याएवढी जागा केली. त्याला कडेने कापड लावून मंदिराचा आकार देत आकर्षक सजावट केली.

त्याचबरोबर या छोट्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली. गणेशोत्सवात सजावटीसाठी वेगवेगळे देखावे, निरनिराळे प्रयोग केले जातात. परंतु हा अनोखा प्रयोग आकर्षणाचा विषय ठरला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment