भंडारदरा : -भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरूच असून गुरुवारी संध्याकाळी धरण शाखेकडून प्रवरा नदीत ५७४८ क्युसेक्सने विसर्ग सुरू असून कृ ष्णवंती नदीतूनही १०२२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसल्याने भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १०५०० दलघफू कायम ठेवून जादा झालेला पाणीसाठा प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे.
मध्यंतरी दोन दिवस पाऊस कमी झाल्याने पाण्याखाली गेलेली भात पिके परत तग धरू लागली होती. परंतु, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने ही भात पिके पाण्याखाली गेली असून लागवड केलेला भात सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असूनही महसूल विभागाने पंचनामे का सुरू केले नाहीत? असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांना पडला आहे. संपूर्ण भात पीकच पाण्याखाली असल्याने पिवळे पडले आहे.
गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणावर २७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून धरणातून एकूण ५७४८ क्युसेक्सने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे.
गत चोवीस तासात भंडारदरा येथे १०३ मि.मी. पाऊस पडला असून तोच पाऊस रतनवाडीला ११६ मि.मी. पडला तर पांजरे येथे ११० मि.मी., वाकी ९७ मि.मी., घाटघर ७२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून कृ ष्णवंती नदी १०२२ क्युसेक्सने वाहत आहे.
- अहिल्यानगरमधील ‘या’ गावामध्ये कावीळ आजाराने घातले थैमान! आरोग्य विभागाची ३० पथके तैनात तर आठवडे बाजार बंद
- संगमनेरमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीमध्ये वाद, भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुलेसह १० जणांवर गुन्हा दाखल!
- मुळा धरणातून सोडण्यात आले चौथे उन्हाळी आवर्तन, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा!
- अहिल्यानगरकरांनो कडक उन्हात सिग्नलवर दीड ते दोन मिनीटे थांबताय, तर तुमच्या मेंदू आणि हृदयाला होऊ शकतो धोका
- Ahilyanagar News : अहिल्यानगर मध्ये भाविकांना मिळणार उसाचा रस, ४० टन उसाचे होणार गाळप