रेल्वे अपघातात पत्रकाराचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर  – दैनिक भास्कर पेपरचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांना  मंगळवार (दि.१३) दुपारी रेल्वेने  जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले.  अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही.

पत्रकार उमेश दारुणकर गेली 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते.

आज दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खालून जात असताना गोवा एक्सप्रेसने उडविले. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment