अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचे संक्रम रोखावे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. परंतु आता ही मंदिरे उघडावीत यासाठी उद्या भाजप नडलं करणार आहे.
आता रोहित पवारांनी यावरून भाजपवर तोफ डागली आहे. ‘भाजप राजकारणासाठी काहीही करू शकतो’ , या आंदोलनामागे काहीतरी राजकारण असावे. परंतु त्यांच्यासह धोरणामुळे जनतेला त्रास होतो अशी टीका त्यांनी केली.
अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते बोलत होते. भाजपला महाराष्ट्राचा, राज्यातील लोकांचा कळकळा असता तर त्यांनी जीएसटीचे पैसे वेळेत राज्याला मिळावे,
यासाठी एकदा तरी पाठपुरावा केला असता असे सांगून ते पुढे म्हणालेकी, ‘मंदिराच्या अवतीभवती जी दुकाने आहेत, जे अर्थकारण आहे, त्याचा विचार केला , तसेच धार्मिक भावनांच्या बाबतीत विचार केला,
तर मंदिर हे उघडावी, हे माझेही म्हणणे होते. पण आपली मंदिरे बघितली तर त्यांचा गाभारा लहान असतो, आणि भावनेच्या भरात तेथे लोकांची गर्दी वाढली, तर आरोग्याच्या अडचणी येऊ शकतात,
‘ असे सांगून पवार पुढे म्हणाले, ‘सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, योग्य तो निर्णय घेतील. पण येथे अर्थकारण हा एवढाच विषय नसून आरोग्य हा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे.
त्यामुळे सरकार या बाबतीत काय निर्णय घेते, ते पाहू. मात्र, भाजप हे कुठल्याही विषयात राजकारण करू शकते, हे सर्वांनाच माहिती आहे असे आ.रोहित पवार म्हणाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved