भजन, पूजन करणा-या भाविकांवर गुन्हे; सरकारचा अजब कारभार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहे.. परंतु, गेले कित्येक दिवस मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्य सरकारकडून याची दखल घेतली जात नसल्याने सरकार विरोधात भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते. श्रीगोंदा येथे शनिवारी घंटानाद आंदोलन झाले.

कोरोनात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले आहे.

संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु आहे. भजन, पूजन करणा-या भाविकांवर गुन्हे दाखल होत आहेत. भाविक, भक्तांना जेल आणि गुन्हेगारांना बेल, असा सरकारचा कारभार सुरु आहे,

अशी टीका राज्य सरकारवर आमदार बबनराव पाचपुते यांनी केली. राज्य सरकारला दारूची दुकाने सुरु करण्याची घाई झाली होती. पण धार्मिकस्थळे उघडण्यास परवानगी का दिली जात नाही? असा सवालही त्यांनी केला.

यावेळी सुनीलराव थोरात , संदीप नागवडे, अशोक खेंडके, सुहासिनी गांधी, दादाराम ढवाण, राजेंद्र उकांडे, संतोष रायकर, संतोष खेतमाळीस, शहाजी हिरवे, शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके, सुनील वाळके, अंबादास औटी, महावीर पटवा, दीपक हिरनावळे, मंदाकिनी शेलार, नितीन नलगे, दत्तात्रय जगताप उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment