वीस- बावीस वर्षात ऑगस्टमध्ये पाचव्यांदा ‘हे’ धरण भरणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्याची संजीवनी असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा 24 हजार 418 दशलक्ष घनफुट इतका झाला आहे. मुळा धरण 94 टक्के भरले आहे. गेल्या वीस- बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्टमध्ये पाचव्यांदा भरण्याची शक्‍यता आहे.

पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम केला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे धरणाची पाणीपातळीत झपाट्याने वाढत आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असून मुळा धरणात शनिवारी 24 हजार 418 दशलक्ष घनफुट पाणी साठ्याची नोंद झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस राहिल्यास येत्या काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन दोन किंवा तीन सप्टेंबरला नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कोतूळ येथून 5 हजार 638 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. कोतूळ येथे 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे पावसाने विश्रांती घेतली आहे.

मुळा धरणात 25 हजार 437 दशलक्ष घनफुट पाणीसाठी झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा धरण भरण्याची उत्सुकता शेतकरी वर्गात शिगेला पोहोचली आहे. मुळा धरण गेल्या तीन वर्षांपासून ओव्हरफ्लो होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment