त्यांनी काय दिवे लावले ?

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले

याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले.

काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते बोलत होते. ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवाजीराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, ज्ञानदेव गवते,

सरपंच सुलोचना वाघ, वैभव पाचपुते, संदीप पाचपुते, अमोल पवार, बन्सी महाराज पाचपुते, विकास पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, महेश दरेकर, नवनाथ राहिंज, अनिल पाचपुते उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे सुरू आहेत. ज्यांना निवडून दिले ते याचे श्रेय घ्यायला निघालेत, अशी टीका पाचपुतेंनी आमदार राहुल जगतापांचे नाव न घेता केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment