अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही आरोग्य कर्मचार्यांचे पगार रखडले असून गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य सेवकांचे अद्याप पगार मिळालेला नाही.
यासाठी राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना नियमित पगार होण्याचे निवेदन देण्यात आले. सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
कैक लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन सर्वाना घरत बसण्याची विनंती करत हे. संपर्ग टाळण्याचे आवाहन करत आहे.
परंतु या संकटात सर्वाना घरात सुरक्षित ठेवण्यासाठी काही कोरोनायोध्ये जीवाची बाजी लावत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय विभाग यातील एक.
मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. परंतु त्यांच्यासोबतच अन्याय झाला आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाजी लावणाऱ्या या योध्यांचे तीन महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वरिष्ठांकडे वेतनबाबत विचारणा केली असता, ते अंगावर धावून येत आहेत.
यामुळे मागे आड पुढे विहीर अशी परिस्थिती त्यांची झाली आहे लॉकडाऊनच्या काळात पगार नसल्यामुळे अनेकांनी हात उसनवार करून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसे घेतले आहेत.
काही आरोग्य कर्मचार्यांचे पगार वेळेवर होतात परंतु काही आरोग्य कर्मचार्यांचे पगार वेळेवर होत नाही. यासाठी वेळेवर पगार होण्याचे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी राहाता यांच्याकडे आरोग्य कर्मचार्यांकडून देण्यात आले. यावेळी राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved