ब्रेकिंग: विखेपाटील घरावर आला होता काळ; शालिनी विखे म्हणतात सुदैवाने बचावले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  आपल्याकडे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे. याचीच प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली.

शालिनीताई विखे या आणि त्यांचे दोन नातू आलेल्या मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता अशीच काहीशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी दिली.

त्याचे झाले असे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षांचा चिरंजीव जयवर्धने हे बिबट्याच्या तावडीतून दुपारी थोडक्‍यात बचावले.

शालिनी विखे पाटील काल दुपारी अडीचच्या सुमारास लोणी येथील शेतात नातवंडांना जेवू घालत असताना डोळ्याची पापणी लवते न लवते, तोच उसातून बिबट्याने त्यांच्याकडे झेप घेतली.

तिघांपासून अवघ्या पाच फुटांवरील कुत्र्याला जबड्यात पकडून तो क्षणात उसात दिसेनासा झाला. देवाच्या कृपेने कुत्रे मध्ये आले, अन्यथा…? काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.

ग्रामदैवत म्हसोबाच्या कृपेने फार मोठे विघ्न टळले. लोकांची अहोरात्र सेवा विखे घराणे करत आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. या आशीर्वादाच्या शक्तीमुळेच आम्ही बचावलो अशी प्रतिक्रिया विखे यांनी दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment