स्व. रामराव आदिक यांनी केलेली विकासकामे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूरचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांनी तालुक्याच्या ठिकाणी पहिली एमआयडीसी आणून आपली आत्मियता दाखवून दिली.

त्यांनी केलेली विकासकामे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. त्यांनी तालुक्यासाठी भरीव योगदान दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले.

बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना अविनाश आदिक बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, भाऊसाहेब डोळस, बापूसाहेब आदिक,

नगरसेवक राजेंद्र पवार, मुख्तार शहा, रईस जहागीरदार, दीपक चरण चव्हाण, अल्तमश पटेल, कलीम कुरेशी, अकिलभाई शेख, साजीद मिर्झा, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष अर्चना पानसरे,

लकी सेठी, योगेश जाधव, दीपक कुऱ्हाडे, हाजी ईस्माईल शेख, नितीन पवार, नितीन गवारे, दीपक निंबाळकर, सोहेल शेख, ऋषी डावखर, राजेश बोर्डे, हंसराज आदिक, भाऊसाहेब वाघ,

सुनील थोरात, प्रशांत खंडागळे, सरवरअली सय्यद, अविनाश पवार, भागचंद औताडे, तौफिक शेख, अॅड. तुषार आदिक, शकिल बागवान, डाॅ. राज शेख, हर्षल दांगट, इम्रान शेख आदी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment