अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- रविवारी दिवसभरात ३२ कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा एकूण आकडा ४४८ वर पोहोचला. गेल्या दोन महिन्यांपासून बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
लाॅकडाऊनच्या सुरूवातीला तालुका प्रशासन सतर्क होते. नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केल्याने कोरोना संसर्ग रोखण्यात यश आले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होऊन रविवारी ती तब्बल ४४८ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. उपचारांनंतर २७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कृषी विद्यापीठात ९६ रुग्ण, विवेकानंद नर्सिंग होम राहुरी फॅक्टरी येथे ८ रुग्ण, तर नगर सिव्हील व खासगी रुग्णालयांत २६ रुग्ण दाखल आहेत. गेल्या दोन महिन्यांत उपचारांदरम्यान १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
संशयित रुग्णांच्या रॅपिड टेस्टसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कोवीड सेंटर, तसेच पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली असली,
तरी या दोन्ही ठिकाणी सुविधांचा बोजवारा उडाला असल्याच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढल्या आहेत, अशी माहिती मिळाली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved