पोलिसांसमोर युवकावर गोळीबार !

Ahmednagarlive24
Published:

नेवासा : घोडेगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ नव्यानेच झालेल्या पोलीस चौकीसमोर सचिन गोरख कुऱ्हाडे या युवकावर दुचाकीवरून आलेल्या चार जणांपैकी एकाने काही कळायच्या आत सायंकाळी सहा वाजता दोन गोळ्या झाडल्या.

विशेष म्हणजे पोेलिसांवर ही घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. सचिनच्या उजव्या खांद्याला एक गोळी लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पिटल अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, काल सकाळी कानडे आणि कुऱ्हाडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. दरम्यानच्या काळात दुपारी हा वाद पूर्णपणे मिटवण्यात आला होता. परंतु, साडेपाच-सहा वाजेच्या सुमारास चौघांपैकी एकाने सचिन कुऱ्हाडेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यानच्या काळात पोलीस हवालदार गावडे यांनी सचिनला झालेल्या प्रकाराबाबत चौकशीसाठी घोडेगाव पोलीस चौकी येथे फोनवरून बोलून घेतले. सचिन पोलीस चौकी समोर येताच चौघेजण दुचाकीवरून आले, त्यांनी पोलिसांसमोरच सचिनवर दोन गोळ्या झाडल्या.

पैकी एक गोळी त्याच्या उजव्या खांद्याला लागली. शंकरबाबा येथील सप्ताहाची समाप्ती सवाद्य मिरवणूक असल्याने गावात घटना उशीर समजली. रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment