अनलॉक-४ साठी नियमावली जारी, नियमावली जाहीर; काय सुरु आणि काय बंद राहणार ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  राज्य सरकारने मिशिन बिगिन अगेन अंतर्गंत अनलॉक-४ साठी नियमावली जारी केली आहे. आहेत. अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात सरकारने अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिशिन बिगिन अगेनच्या टप्प्यात काही नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी अद्यापही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. त्यामुळे लोकांना आता आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मंदिरं आणि जिम यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत. जिम सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही.

अनलॉक-४च्या टप्प्यात राज्यात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याचा घेतलेला एक आढावा.

कोणत्या गोष्टी राहणार बंद ?

१) शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

२) चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम

३) आंररराष्ट्रीय प्रवासाला बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली असेल तर मुभा

४) मेट्रो बंदच राहणार

५) सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

कायम कोणत्या गोष्टींना परवानगी

१) हॉटेल आणि लॉज यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी

२) खासगी कार्यालय क्षमतेच्या ३० टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम सुरु करु शकतात.

३) प्रवासी तसंच मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द. प्रवासासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

४) खासगी बस, मिनी बस तसंच इतर ऑपरेटर्सना परवानगी

५) कोणत्याही अटीविना शारिरीक हालचालींसाठी परवानगी करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी व बिघडलेली जीवनशैली पुन्हा सुरळीत करण्यासाठी राज्यात मिशन बिगिन अगेनची घोषणा करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment