अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोरोनाची छाया यावेळी सर्वच धार्मिक सण – उत्सवावर पडली. शेकडो वर्षांची परंपरा असणारी पंढरीची वारी यावेळी रद्द करण्यात आली.
तसेच अनेक धर्मातील अनेक सण-उत्सव हे अंत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. गणेशोत्सवावरही याचे सावट आहे. नेहमी वाजत गाजत येणाऱ्या आणि तेवढ्याच धुमधडाक्यातील विसर्जन मिरवणुकीतून निरोप घेणाऱ्या गणरायाच्या उत्सवावरही यंदा कोरोनामुळे सावट आलं आहे.
आज (मंगळवार) त्यांना निरोप दिला जाणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही. महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम कुंड तयार करून विसर्जनाची सोय केली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी बाप्पाची शेवटची आरती करण्यालाही मनाई करण्यात आली आहे.
यंदा कोणतीच विसर्जन मिरवणूक निघणार नाही. मानाच्या गणपती मंडळाच्या मूर्ती महापालिका स्वत: स्वीकारून त्याचे विसर्जन करणार आहे. महापालिकेने घरगुती गणपती विसर्जनासाठी शहरात ठिकठिकाणी 23 ठिकाणी विसर्जन कुंड तयार केले आहेत.
याशिवाय प्रत्येक वॉर्डात महापालिकेची वाहने विसर्जनाची गणपती मूर्ती स्वीकारणार आहेत. हे कर्मचारी मूर्तीचे नंतर विधिवत विसर्जन करतील, असे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.
* येथे होणार विसर्जन –
भारत बेकरी चौक (बोल्हेगाव ), मयूर कॉर्नर चौक (वडगाव गुप्ता), नाना चौक (तपोवन रोड), साईबाबा मंदिर (निर्मलनगर), यशोदानगर विहीर व मोकळी जागा (पाईपलाईन रोड),
महालक्ष्मी उद्यान (बालिकाश्रम रोड), गंगा उद्यान (मिस्कीन मळा), बाळाजी बुवा विहीर (कल्याण रोड), नेप्तीनाका (कल्याण रोड), पुलाशेजारची खुली जागा (सारसनगर),
साईनगर उद्यान (बुरुडगाव), लोखंडी पुलाशेजारी (स्टेशन रोड), क्रांती चौक (केडगाव लिंक रोड), बुद्धविहार शेजारी (केडगाव), केडगाव देवी मंदिर (केडगाव),
फिरोदिया हायस्कूल पटांगण (वाडियापार्क समोर), सावेडी जॉगिंग ट्रॅक (प्रोफेसर चौक), हनुमान मंदिर (गोविंदपुरा), न्यू आर्ट्स महाविद्यालयासमोरील खुली जागा, बारा इमाम कोठला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved