अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.८२ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७७३ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५९, संगमनेर ०१, पाथर्डी ०७, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०२, श्रीगोंदा २५, अकोले ०२, राहुरी ०५, शेवगाव १८, कोपरगाव ०९, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ६८१ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २६९, संगमनेर ४५, राहाता ४७, पाथर्डी ०९, नगर ग्रा.४९, श्रीरामपूर २४,
कॅन्टोन्मेंट १३, नेवासा १३, श्रीगोंदा ४०, पारनेर १२, अकोले ५०, राहुरी २५, शेवगाव १८, कोपरगाव २७, जामखेड २८, कर्जत ०४, मिलिटरी हॉस्पिटल ०४ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या: १८५५७
- उपचार सुरू असलेले रूग्ण:२७७३
- मृत्यू: २९४
- एकूण रूग्ण संख्या:२१६२४
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved