कोरोनामुळे खासगी रुग्णालयांच्या नियमातही ढिलाई ; ‘ह्या’कडे होतोय कानाडोळा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  सध्या कोरोनाचे संक्रमण संपूर्ण देशात फैलावत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक कामकाज विलंबित राहिली आहेत.

त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील अनेक रुग्णालयांची परवाना मुदत महिनाभरापूर्वीच संपली आहे व त्याच्या नूतनीकरणाकडे मात्र कानाडोळा होताना दिसत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांना नर्सिंग होम परवान्यासाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. ती मुदत संपून आता महिना उलटला आहे तरी देखील नूतनीकरण झालेले नाही.

मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्टमध्ये रुग्णालयांना दिलेले नोंदणी प्रमाणपत्र हे कलम 7 च्या तरतुदीस अधीन राहून, ज्या दिनांकास ते देण्यात आले किंवा यशास्थिती त्याचे नवीनकरण करण्यात आले,

त्या दिनाकांच्या लगतनंतर येणार्‍या तिसर्‍या वर्षाच्या 31 मार्च या दिनांकापर्यंत अंमलात राहील. तोपर्यंत ते वैध असेल असा सुस्पष्ट उल्लेख आहे. या कायद्यात कलम 3 च्या तरतुदी उल्लंघनासाठी शिक्षेची तरतूद आहे.

जिल्ह्यात जवळपास 200 रुग्णालयांनी नर्सिंग कायद्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे परवान्यांचे नुतनीकरण केलेले नाही.

परवाना नुतनीकरण नसताना या रुग्णालयांनी आरोग्य सेवा दिलीच कशी? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या दुर्लक्षाबद्दल प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागून राहिले आहे .

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment