धक्कादायक! 6 मराठी कलाकारांना कोरोनाची लागण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. राज्य सरकारने मिशिन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये चित्रपट आणि टीव्ही सिरीयलच्या शूटिंगला परवानगी दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामध्ये मराठीतील एका दिग्गज अभिनेत्यासह 6 कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते.

त्यानंतर आता आणखीन काही मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन 2 मधील स्पर्धक अभिजीत केळकर आणि तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री पूर्णिमा डे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नुकतेच झी युवा वाहिनीवरील सिंंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअ‍ॅलिटी शोमध्ये अभिजीत व पुर्णिमा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. या शोच्या सेटवरच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांंना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते दोघेही बरे झाले आहेत.

सेटवरील दोन क्रू मेंंबर्स सुद्धा कोरोनाबाधित आहेत असे समजते आहे. त्यामुळे 10 सप्टेंबरपर्यंत या शोचे शूटिंग बंद आहे. अभिजीत केळकरने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे इंस्टाग्रामवर सांगितले. त्याने लिहिले की, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली.

माझी फक्त पाठ दुखत होती या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हते किंवा सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षण नव्हती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली त्यानंतर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे. आता माझी तब्येत उत्तम आहे. तसेच अभिजीतने पत्नी तृप्ती आणि मुले राधा व मल्हार ठणठणीत असल्याचे सुद्धा सांगितले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment