विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 288 मतदारसंघांतील उमेदवार निश्चित

Ahmednagarlive24
Published:

मुंबई – सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते तीन संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस लवकरच काँग्रेसच्या केंद्रीय निवड मंडळाला करण्यात येणार आहे. 

प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात 54 सदस्य आहेत. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस टिळक भवनात बैठका झाल्या. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-कोकण अशा विभागवार मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यात आला.

29 ते 31 जुलैदरम्यान विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यापूर्वीच जिल्हावार पार पडल्या होत्या. त्यासाठी राज्यभरातून सुमारे 1100 अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हा समित्यांनी मुलाखतींचे अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवले होते. त्यावर दोन दिवस चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते चार नावे निश्चित करण्यात आली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment