अहमदनगर ब्रेकिंग : विचित्र अपघात घडून एक ठार, ट्रकमध्ये होत्या गॅस सिलेंडरच्या टाक्या …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रस्त्यावरील त्रिभुवनवाडी फाट्या जवळ आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनांचा विचित्र अपघात घडून या अपघातामध्ये एक ठार तीन जखमी झाले आहेत. 

या अपघाताबाबतची सविस्तर माहिती अशी की नगर पाथर्डी रस्त्यावरील त्रिभूवनवाडी फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनाचा अपघात झाला.

या अपघातामध्ये बुलेट मोटरसायकल वरील राजेंद्र देविदास पिंपळे (वय वर्षे 30) राहणार शेडाळा तालुकाआष्टी हा तरुण ठार झाला आहे. तर त्याच्यासोबतचे सुनील आप्पा काकडे (वय वर्ष 25), सागर संपत माळी (वय वर्ष 25) दोघे राहणारा गंगादेवी तालुका आष्टी गंभीर जखमी झाले आहेत.

त्याच बरोबर जीप ड्रायव्हर बापू कोळसे (वय वर्ष 25) राहणार उमापूर जिल्हा बीड हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला देखील नगरला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातग्रस्त ट्रकमध्ये गॅस सिलेंडरच्या टाक्या होत्या.आणखी काही मोठी घटना घडली नाही.अपघातातील सर्व जखमींना करंजी येथील पोलिसांच्या मदतीने नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment