अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- पारनेर तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच भारतीय स्टेट बँकेच्या पारनेर शाखेत प्रत्येकी एक जण कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे.
तहसिलदार ज्योती देवरे यांनी ही माहीती दिली. तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच स्टेट बँकेची शाखा ही दोन्हीही ठिकाणे वर्दळीची असून तेथे नागरीकांचा एकमेकांशी मोठया प्रमाणात संपर्क येतो.
त्या दोन्ही ठिकाणी कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेउन त्यांच्या चाचण्या करणे हे मोठे आव्हाण प्रशासनापुढे आहे.
दरम्यान, दोन्ही ठिकाणी त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या कर्मचा-यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तेथील कामकाज मात्र बंद न ठेवता उपाययोजना करून नागरीकांच्या साईसाठी सुरूच ठेवण्यात आल्याचे तहसिलदार देवरे यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved