या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   केडगाव महापालिका कोविड सेंटरमध्ये अत्यावश्यक सुविधा मिळत नसल्याने कोविड बाधित रुग्णासह नगर-पुणे रस्तारोको करण्यास परवानगी मिळवी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेनेचे अहमदनगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, सुनिताताई कोतकर, शांताबाई शिंदे आदी उपस्थित होते. केडगाव येथे महापालिकेने कोविड सेंटर सुरू केले.

पण त्या ठिकाणी मनपा सुविधा देत नाही. कोविड सेंटरमध्ये एक तज्ञ डॉक्टर, फार्मासिस्ट आणि रोटेशन प्रमाणे ५ ते ६ सिस्टर व स्वच्छतेसाठी आवश्यक कर्मचारी पुरविणे असताना मनपाने कोणतीही उपाययोजना केली नाही.

या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणे नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठीआवश्यक ऑक्सिजन सुविधा नाही. वारंवार मनपा आयुक्तांकडे तक्रारी केल्या असताना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.

कोविड सेंटरमधील रुग्ण व नातेवाईक हातबल झाले आहेत. दोन दिवसांत तातडीने केडगाव कोविड सेंटरमध्ये महापालिकेने सुविधा पुरविल्या नाहीतर केडगावचे चारही नगरसेवक आणि नगर शहर शिवसेनेतर्फे कोविड रुग्णासह ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख सातपुते यांनी दिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment