अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोग्य यंत्रणेतील अधिकार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच सर्व शासकीय रुग्णालयात पत्रकारांसाठी बेड राखीव असावेत, अशा मागण्या जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पत्रकार रायकर यांना आरोग्य सुविधा देण्यात हाॅस्पिटल प्रशासन व संबधित प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
रायकर यांना रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर वेळेत मिळण्यासाठी पुण्यातील अनेक पत्रकारांनी संबंधितांना फोनद्वारे विनंत्या केल्या होत्या. तरी त्या वेळेत न मिळाल्याने प्रकृती खालावत गेली व पांडूरंग यांचा आरोग्य सुविधांआभावी मृत्यू झाला.
या आभावास जवाबदार हाॅस्पिटल व प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. सर्व शासकीय रुग्णालयात पत्रकारांसाठी बेड राखीव असावेत अशी मागणी करण्यात आली.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार नासीर पठाण, अशोक निमोणकर, मिठूलाल नवलाखा, यासीन शेख, संजय वारभोग, सुदाम वराट उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved