अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा या गावात श्रावणबाबा समाधी मंदिर स्थळाजवळ दहा फूट अंतरावर खोदकाम सुरू असताना सांगाडा आणि काही पुरातन भांडी सापडली.
त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ढोरजा येथील श्रावणबाबा समाधी मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू आहे.
या मंदिरापासून दहा फूट अंतरावर आज चौथऱ्याच्या बाजूला काही लोकांना खोदकाम करताना हाडे व त्याजवळ पुरातन मातीची भांडे, टाळ, पूजेचा एक तांब्या, एक चमचा, लाकडी चिपळ्या या वस्तू सापडल्या.
काही व्यक्तींंनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, श्रावणबाबांच्या एखाद्या शिष्याची ही समाधी असण्याची शक्यता काही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. तर, पोलिसांनी या सर्व वस्तू ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved