नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे (वाळकी) माजी संचालक आणि खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानदेव दळवी पाटील यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
ते कै. जगन्नाथ दळवी पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात ५ मुली, एक मुलगा, सून, आई, पत्नी असा मोठा परिवार आहे. खा. दादा पाटील शेळके यांसोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी काम पाहिले.
त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मंत्री बाळासाहेब थोरात, आ. संग्राम जगताप, मंत्री शंकरराव गडाख, आ. लंके यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
ज्ञानदेव दळवी पाटील हे मुत्सद्दी आणि हुशार राजकारणी आणि समाजकारणी होते. त्यांच्या प्रयत्नातून तालुक्यात जलसंधारणाची कामे झाली.
त्यांच्या जाण्याने राजकारणातील कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे मत यावेळी आ. लंके यांनी व्यक्त केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved