जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व जनता स्वीकारेल, असे वाटत नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमधून लढण्याच्या तयारी करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाष्य करताना कोणाचेही नाव न घेता राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये कोणाला कुठे उभे राहायचे, हा ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे.

मात्र, नगर जिल्ह्यामध्ये सक्षम मंडळी आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व येथील जनता स्वीकारेल, असे वाटत नाही.

‘नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही बऱ्याच दिवसांपासून लोकांची मागणी आहे. त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. पण पाणी व रोजगारासारखे मोठे प्रश्न जिल्ह्यासमोर आहेत.

ते सोडविण्यासाठी अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विखे यांनी पाणी नियोजनासंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment