संभाजी बिडी वरून आ.रोहित पवार झाले आक्रमक म्हणाले महाराजांच्या….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. 

लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.


पुण्यात उत्पादन होणारी ही बिडी संभाजी बिडी या नावाने विक्री केली जाते. आता पवार यांनी बिडीला दिलेल्या संभाजी महाराज यांच्या नावाला आक्षेप घेतला आहे.

आ.रोहित पवार यांनी कंगणा रणौत हिच्या मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला असून मुंबई, महाराष्ट्राबाबत चुकीचं बोलणं महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. आ.पवार यांनी आपल्या अधिकृत व्टिटर खात्यावरुन याबाबत मत मांडले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment