पाथर्डी :- तालुक्यातील दगडवाडी येथे टँकरच्या पाण्यावरून वाद होऊन ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ दशरथ वाकचौरे यांना बेदम मारहाण करण्यात आली.
दगडवाडीत भिषण पाणी टंचाई आहे. मिरी तिसगाव नळ योजनेचे पाणी नियमित व वेळेवर येत नसल्याने अधूनमधून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.
ग्रामपंचायत कर्मचारी वाकचौरे प्रत्येक चौकात उभ्या केलेल्या प्लास्टिक टाक्या पाण्याने भरून देत असताना माझ्या हौदात पाणी टाका, अशी मागणी गावातील रवींद्र शिंदे याने केली,
परंतु हौदात पाणी देण्यास ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने नकार दिला. त्यावरून शिंदे व वाकचौरे यांच्यात वादावादी झाली. शिंदे याने वाकचौरे यास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची फिर्याद पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.