पोलिसांकडून ‘या’ कुख्यात गुंडाना अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – सावेडी येथील कविजंग नगर कळमकर हॉस्पिटलच्या समोर जमिनीच्या ताबा घेण्यासाठी आलेला कुख्यात गुंड व लँड माफिया दिशान शेख याला फिर्यादी नाजीश अरबाज शेख याच्या तक्रारीवरुन तोफखाना पोलीसांनी आज (दि.5 सप्टेंबर) रोजी अटक केली.

नाजीश शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिशान शेख व त्यांच्या साथीदार सदर जागेचा ताबा घेण्यासाठी आले होते. त्यांना विरोध केला असता दिशान व त्याच्या साथीदारांनी मला व कुंटुंबीयांना जबर मारहाण केली.

घरातील महिलांना त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन अरेरावीची भाषा वापरली. शिवीगाळ, दमदाटी करुन आंम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हंटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment