अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील एका शिक्षकाने नगरची मान उंचावेल असे काम केले आहे.
जिल्ह्यातील गोपाळवाडी (ता. राहुरी) जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे हस्ते मंगलाराम यांनी नगर येथे हे सन्मानपत्र स्विकारले.
*17 वर्षाची सेवा सार्थ ठरली* : मंगलाराम हे राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत मंगलाराम हे नवनवीन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिकवतात.
त्यांनी ई-लर्निंग पद्धतीचा अवलंब केला असून, शाळेतील प्रत्येक वर्ग डिजीटल केला आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा
२०१६ चा जिल्हा गुरुगौरव पुरस्कार मिळाला आहे. अमन सोशल क्लबचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













