अत्यंत संतापजनक माहिती : अहमदनगरकरानों भाजपने जो खोटेपणा केलाय तो वाचून तुम्हाला धक्काच बसेल….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगरमध्ये भाजपाची भलतंसलता गवगवा करण्याची पद्धत उघड झाली आहे. करायचे एकाने आणि श्रेय घ्यायचे भाजपने अशीच काहीशी वृत्ती यातून समोर आली आहे.

महापालिकेने लाखो रुपये खर्च करून नटराजमधील कोवीड सेंटर सुरु केले. परंतु ते भाजपने सुरु केले असा गवगवा सगळीकडे करण्यात आला. सेंटर भाजपाने सुरू केल्याच्या जाहिराती सोशल मीडियावर फिरत आहे.

पंडित दिनदयाळ पतसंस्थेच्या सहकार्याने असा उल्लेख त्यात आहे. भाजपने शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी हे कोवीड केअर सेंटर सुरू केल्याचे त्यातून भासविण्यात आले आहे.

मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. याठिकाणी महापालिकेमार्फत बाधितांवर उपचार तर केवळ जेवणाचा खर्च भाजप करणार असून त्या खर्चालाही स्पॉन्सर बघण्यात आला आहे.

भाजप आणि स्पॉन्सर असलेली पतसंस्था सेंटरमधील बाधितांना जेवण, नाश्ता देणार आहे. रुग्णांवर मनपाचे डॉक्टर उपचार करणार असून औषधेही मनपाच पुरविणार आहे.

याशिवाय नटराज हॉटेलची साफसफाई करण्याकरीता मनपाने सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले जात आहे. सदर गोष्ट महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही मान्य केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment