अहमदनगर (प्रतिनिधी)- आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धाऊन जाणार्या जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने नगरमधून जीवनावश्यक वस्तू, औषधे, कपडे, अन्न-धान्य, किराणा, दैनंदिन वापरातील वस्तू आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचा समावेश असलेली मदत कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली.
श्रीमती कमलबाई कणकमल गुगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रकने भरलेले मदतीचे साहित्य कौठे (ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथे नुकतेच रवाना झाली.कमलबाई कणकमल गुगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रकने भरलेले मदतीचे साहित्य कौठे (ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथे नुकतेच रवाना झाली.
कौठे या गावातील पूराचे पाणी ओसरले असून, अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. जायंट्स इंटरनॅशनलने कौठे हे गाव दत्त घेतले असून, या गावकर्यांचे संसार उभे करण्यासाठी जायंट्स योजदान देत आहे.
जमा केलेली मदत शेवटच्या घटका पर्यंन्य पोहचण्यासाठी नगरमधून जायंट्स इंटरनॅशनलचे सदस्य संजय गुगळे, अनिल गांधी, अभय मुथा, संदीप धोका, राजो झंवर, प्रणव गांधी, डॉ.विनय शहा, किरण बोथरा गाडीसह नुकतेच रवाना झाले.
यावेळी नगरसेवक गणेश भोसले, संजय चोपडा, राजेंद्र गांधी, भावना कटारिया, अमित धोका, सुधीर लांडगे, अनिल मेहेर, प्रमोद गांधी, मोनिका गांधी, नुतन गुगळे, दर्शन गुगळे, राजेंद्र कटारीया, हिरालाल चंगेडिया, विजय गुगळे, अजय भोयर, रोशन गुगळे, भुषण गुगळे आदी उपस्थित होते.
संजय गुगळे यांच्या पुढाकारातून जायंट्स क्लबच्या माध्यमातून ही मदत जमा करण्यात आली. 4 ते 5 लाख रुपये वस्तू स्वरुपातील ही मदत असून, यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅगसह शैक्षणिक वस्तूचे 75 हजार रुपायाचे किटचा यामध्ये समावेश आहे.
ही मदत पाठविताना माहेरी आलेल्या सुवासिनींनी आपल्या सासराकडील भागात मदतीसाठी योगदान दिले आहे. भारतीय संस्कृतीशी नाळ जुडलेली जायंट्स आंतरराष्ट्रीय संघटना असून सामाजिक कार्यासाठी ही सदैव तत्पर असते. यापुर्वी देखील गुजरात व किल्लारी येथील भूकंपात मदत घेऊन शेवटच्या घटका पर्यंन्त मदत देण्याचे कार्य संघटनेने केले असून, सामाजिक जाणीव व संवेदना जागृक ठेऊन मदतीचे कार्य चालू असल्याचे गुगळे यांनी सांगितले.