कोरोना झाल्याने शिक्षकाचे कुटुंब रुग्णालयात, आणि इकडे घरात दीड लाखांची चोरी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे चोरट्यांच्या नालाईकपणाचे दर्शन घडले आहे. कारण, येथे एक तुंबारे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये अ‍ॅडमिट केले होते.

याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लक्ष ठेऊन डाव साधत या शिक्षकाच्या घरावर डल्ला मारला. यात तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोने व पंन्नासहजार

रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. ही घटना सोमवार दि. 31 ऑगस्ट ते शनिवार

दि. 5 सप्टेंबर 2020 या दरम्यान घडली. याप्रकरणी तुंबारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment