अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. २४ तासांत आणखी ८६९ पॉझिटिव्ह आढळले. सात जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ३७८ झाली.
नगर शहरात सर्वाधिक रुग्ण सोमवारी आढळून आले. जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर २६.७० टक्के झाला आहे. चार दिवसांपूर्वी सर्वाधिक ८९९ रुग्ण आढळून आले होते.
रविवारी सायंकाळी सहापासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये ३२९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४६ आणि अँटीजेन चाचणीत २९४ बाधित आढळले.
नगर शहरात सर्वाधिक २६१ पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यात आता २६,४८२ बाधित झाले आहेत. कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये ३२९ पॉझिटिव्ह आढळून आले.
बाधितांमध्ये मनपा ६३, संगमनेर ४९, राहाता ३, पाथर्डी ५, नगर ग्रामीण ३८, श्रीरामपूर १०, कॅन्टोन्मेंट ७, नेवासे ५, श्रीगोंदे ४३, पारनेर ८, अकोले ३३, राहुरी ३२, कोपरगाव २६, जामखेड २, कर्जत ५ रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४६ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मनपा ११२, संगमनेर २०, राहाता २४, पाथर्डी १, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ४, नेवासे ६, श्रीगोंदे २, पारनेर १५, अकोले १, राहुरी १६, कोपरगाव २,
जामखेड २ आणि कर्जत २ रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत मनपा ८६, संगमनेर २३, राहाता २१, पाथर्डी ६, नगर ग्रामीण १६,
श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट २, श्रीगोंदे १९, पारनेर १८, अकोले २७, राहुरी १, कोपरगाव ११, जामखेड १५ आणि कर्जत ३२ रुग्णांचा समावेश आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved