अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील एरंडोली येथे १ लाख ६५ हजार रुपये खर्चून तयार केलेल्या एक एकराचा संतोष भंडारे यांना टोमॅटोचा प्लॉट बोगस रोपे दिल्याने प्लॉट खराब होऊन उत्पन्न न मिळाल्याने या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले
असल्यान शेतकरीे संतोष भंडारे यांनी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्याकडे शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील तनिष्का नर्सरी विरूद्ध सोमवारी तक्रार दाखल करत भरपाईची मागणी केली.
तालुक्यातील एरंडोली येथील संतोष भंडारे यांनी जून महिन्यात एक एकराच्या क्षेत्रात शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील तनिष्का नर्सरी येथून आणलेल्या
टोमॅटोच्या रोपांचे लागण करत विक्रमी उत्पादनासाठी एक एकरा करिता सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा खर्च खते व औषधे याकरिता खर्च केले
मात्र टोमॅटोचे रोपे खराब निघाल्याने उत्पादन न निघाल्याने भंडारे यांचे सुमारे १६ ते १७ लाखांचे नुकसान झाले असून याबाबत तालुका कृषी
तालुका अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्याकडे शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील तनिष्का नर्सरी विरूद्ध तक्रार दाखल करत नुकसान भरपाईची मागणी केली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved