राहुरी : मुळा धरण पाहण्यासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचा ६० हजार किमतीचा अॅपल आयफोन भामट्याने लांबवला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ते पाहण्यासाठी पूजा राजेश पेटकर (गोरेगाव, मुंबई) या कुटुंबासमवेत आल्या होत्या. पेटकर यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात ठेवलेला अॅपल कंपनीचा मोबाइल भामट्याने हातोहात लांबवला.
मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात येताच पेटकर यांनी शोध घेतला. मात्र, तो व्यर्थ ठरला. राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तपास पोलिस नाईक संजय जाधव करत आहेत. मुळा धरणावर येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाच्या काचांची तोडफोड करून चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या.
सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तथापि, यावर पायबंद बसला नाही.