अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढू लागला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
दरम्यान; संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवाराजवळच कान्हू गिते यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार बोकड व तीन शेळ्यां ठार झाल्या आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार झाल्या असून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान; गिते यांचा शेळ्याचा गोठा हा लोखंडी जाळीने बंदिस्त आहे.
मात्र तरीही पत्र्याच्या बाजूने असलेल्या छोट्याशा जागेतून बिबट्याने आतमध्ये प्रवेश करून सात शेळ्या ठार केल्या. गिते यांनी वनविभागाला या घटनेबाबत माहिती दिली.
गिते यांचे अंदाजे 80 हजार ते 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्यामुळे वनविभागाने गिते यांना तत्काळ अर्थिक मदत करावी. तसेच या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved